Last Updated: Wednesday, August 28, 2013, 08:15
www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्लीआज देशभरात जन्माष्टमीची धूम पाहायला मिळणार आहे. यानिमित्तानं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही कृष्ण जन्माष्टमीच्या सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आणि सर्व लोक प्रामाणिकपणा आणि सत्याचा मार्ग अवलंबतील अशी आशा व्यक्त केली.
राष्ट्रपती म्हणाले, “जन्माष्टमीच्यानिमित्तानं देशातले संपूर्ण नागरिकांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. या पवित्र दिवशी आपल्याला भगवान श्रीकृष्णानं दिलेला संदेश आचरणात आणला पाहिजे. मन, कर्म आणि सत्याचा मार्ग अवलंबला पाहिजे.”
“निष्काम कर्म म्हणजेच कोणत्याही फळाची अपेक्षा न करता केलेलं काम” हा भगवान श्रीकृषणानं दाखवलेला मार्ग आपण सगळ्यांनी एकत्र येवून पाळला पाहिजे. त्यामुळं देशात शांती, समृद्धी आणि प्रगती प्रस्थापित होईल, असंही राष्ट्रपती म्हणाले.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, August 28, 2013, 08:15