दिल्लीत येणार राष्ट्रपती राजवट, विधानसभा होणार बरखास्तPresident`s rule recommended in Delhi, LG send

दिल्लीत येणार राष्ट्रपती राजवट, विधानसभा होणार बरखास्त?

दिल्लीत येणार राष्ट्रपती राजवट, विधानसभा होणार बरखास्त?
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

दिल्लीमध्ये सरकार बनवण्याची शेवटची तारीख जवळ येतेय. येत्या दोन दिवसांत म्हणजे १८ डिसेंबरपर्यंत दिल्लीत सरकार स्थापन झालं नाही. तर दिल्ली विधानसभा बरखास्त होऊन तिथं राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे.

दिल्लीत सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली सुरु झालेल्या असतानाच काँग्रेसनं आम आदमी पार्टीला सकारात्मक उत्तर पाठवत १८ मुद्दे मान्य असल्याचं म्हटलंय.

अरविंद केजरीवाल यांनी पाठवलेल्या पत्राला उत्तर देताना कांग्रेसनं यातील १६ मुद्दे हे प्रशासकीय असल्याचं म्हटलंय. तर इतर दोन मुद्दे काँग्रेसनं मान्य केले आहेत. सरकार स्थापनेचा तिढा निर्माण झालेला असताना, समर्थनासाठी केजरीवाल यांनी काँग्रेस आणि भाजपला १८ मुद्द्यांवर उत्तर मागितलं होतं. या पत्राला भाजपनं उत्तर दिलं नाही.

मात्र काँग्रेसनं आम आदमी पार्टीचे १८ मुद्दे मान्य केले आहेत. काँग्रेसनं पाठवलेल्या पत्रावर आम आदमी पार्टीच्या मुख्य नेत्यांची बैठकही पार पडली. या बैठकीनंतर उद्या जनतेतंच काँग्रेसच्या पाठिंब्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती कुमार विश्वास यांनी दिली आहे.

दुसरीकडे दिल्लीच्या उपराज्यपालांनी विधानसभा निलंबित करुन, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 16, 2013, 18:44


comments powered by Disqus