Last Updated: Tuesday, September 11, 2012, 16:21
www.24taas.com, नवी दिल्लीमाझा आता ऍण्टिक पीस झालाय, अशी उपहासगर्भ टिप्पणी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज येथे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजतर्फे (सीआयआय) आयोजित सत्कार समारंभात केली. मुखर्जी हे अर्थमंत्रालयातून बाहेर पडून राष्ट्रपती भवनात जाऊन विसावताच यूपीए सरकारने त्यांच्या कार्यकाळातील पूर्वलक्ष कर प्रस्तावाचा फेरआढावा सुरू केला आहे.
राष्ट्रपतींची उपहासगर्भ टिप्पणी त्या पार्श्वभूमीवर आल्याची कुजबूज सभागृहात लगेच सुरू झाली. राष्ट्रपती पुढे म्हणाले की, आता मला सल्ला देण्याच्या नावाखाली मुक्तपणे बोलण्याचे स्वातंत्र्य आहे हा मोठाच फायदा आहे. पण माझ्या मताप्रमाणे किंवा मला अभिप्रेत असलेली गोष्ट अमलात आणता येत नाही हा तोटाही मोठाच आहे.
नव्या पिढीने राजकारणाची सूत्रे हाती घेतली पाहिजेत, असे सांगतानाच आमच्यासारख्या ज्येष्ठांनी बाजूला होऊन त्यांना वाट करून दिली पाहिजे, असेही मुखर्जी यांनी यावेळी सांगितले.
First Published: Tuesday, September 11, 2012, 16:21