पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी!Prithivi-II successfully test-fired in Odisha

पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी!

पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी!
www.24taas.com,पीटीआय, भुवनेश्वर

भारताच्या पृथ्वी-२ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची ओडिशामधील चंडीपूर इथल्या तळावरून यशस्वी चाचणी करण्यात आलीय. पृथ्वी हे जमिनीवरून जमिनीवर हल्ला करणारं क्षेपणास्त्र असून ३५० किमीच्या पट्ट्यात ते मारा करू शकतं.

ओडिशाची राजधानी भुवनेश्वर इथून २३० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बालोसोर जिल्ह्यातील चांदीपूर इथं सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. बंगालच्या समुद्रात ठेवण्यात आलेल्या लक्षाचा पृथ्वी-२नं अचूक वेध घेतला. ३५० किमीचा पल्ला असलेलं पृथ्वी - २ हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. ही चाचणी नियमित सरावचाचणी मोहिमेचाच एक भाग असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

पृथ्वी - २ हे पहिलं स्वदेशी बनावटीचं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र असून हे क्षेपणास्त्र ५०० किलो युद्धसामुगी वाहून नेऊ शकतं. याआधी चंडीपूर इथूनच पृथ्वी-२ ची यशस्वी चाचणी १२ ऑगस्ट २०१३ला करण्यात आली होती.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, October 7, 2013, 11:46


comments powered by Disqus