प्रियांका गांधी करणार अवयव दान, Priyanka Gandhi Vadra, Brinda Karat to donate organs

प्रियांका गांधी करणार अवयव दान

प्रियांका गांधी करणार अवयव दान
www.24taas.com, नवी दिल्ली

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांका गांधी वढेरा यांनी बुधवारी अवयवदान करण्याची घोषणा केलीय. यावेळी मार्क्सावादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांच्यासह ५०० जणांनी आज अवयवदानाची शपथ घेतली.

दिल्लीतल्या सर गंगा राम हॉस्पिटलनं अवयवदानाबाबत जागरूकता आणून यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शिबिराचे आयोजन केलं होते. त्यामध्ये प्रियांका गांधी येणार होत्या. पण त्यांना उपस्थित राहणं शक्य झालं नाही. त्यामुळे हॉस्पीटलच्या अधिकाऱ्यांना एसएमएस पाठवून प्रियांकानं हे आपल्याला अवयव दान करण्याची इच्छा असल्याचं कळवलं. त्यानंतर हॉस्पीटलनं या कार्यक्रमात ही घोषणा केलीय.

वृंदा कारत यांनीही अवयवदान करण्यास पाठिंबा दर्शविला. अवयवदानामध्ये भारतीय बरेच मागे असून अनेकांमध्ये याबाबत जागरूकता नसल्याचं या कार्यक्रमात समोर आलंय. देशातील २० टक्के कुटुंबांनी जरी त्यांच्यातील एकाच्या मरणोत्तर अवयवदानास परवानगी दिली, तरी भारतातील अवयव प्रत्यारोपणासाठीची अवयवांची सर्व गरज भागेल, असं यावेळी डॉक्टरांनी म्हटलंय.

First Published: Thursday, December 6, 2012, 12:33


comments powered by Disqus