मोदींविरोधातील `प्रियंका अस्त्र` भात्यातच!, Priyanka is not going to contest election

मोदींविरोधातील `प्रियंका अस्त्र` भात्यातच!

मोदींविरोधातील `प्रियंका अस्त्र` भात्यातच!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना शह देण्यासाठी काँग्रेस प्रियांका अस्त्राची वापर करणार असल्याची माहिती काँग्रेसमधल्या सूत्रांनी दिली होती. काँग्रेसनं मात्र या वृत्ताचं तत्काळ खंडन केलंय. प्रियंका गांधी अमेठी-रायबरेलीमधून बाहेर पडणार आणि देशभर निवडणुक प्रचार करणार असल्याचं वृत्त काही वाहिन्यांनी दिलं...

मध्यप्रदेशमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या भीषण घटनेवरून देशाचं लक्ष उडवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेस नेते अजय माकन यांनी केलाय. प्रियंका गांधी आता देशभर निवडणुकीत प्रचार करणार असल्याची सूत्रांनी दिली होती. प्रियंका गांधी याआधी केवळ अमेठी आणि रायबरेलीमध्येच प्रचार करत होत्या. आता मोदींविरोधात प्रियंका गांधी प्रचार करणार असल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या.

काँग्रेसकडून यासंदर्भात आज घोषणा होण्याची शक्यता होती. मात्र प्रियंका निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, October 14, 2013, 15:21


comments powered by Disqus