Last Updated: Tuesday, January 15, 2013, 14:03
www.24taas.com, लुधियाना पुँछ भागात पाकिस्तान सेनेकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करून दोन भारतीय जवानांची अत्यंत क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आल्यानंतर पंजाब शिवसेना उसळलीय. पाकिस्तानी सैनिकांचं मुंडकं छाटून आणणाऱ्या व्यक्तिला एक करोड रुपयांचं बक्षीसचं त्यांनी जाहीर केलंय.
या बक्षिसाच्या रकमेत अनेकांनी स्व-कमाईचाही समावेश केलाय. हिंदू मोर्चाचे वरुण मेहता आणि शम्मी पुरी, माँ वैष्णो देवी क्लबचे राजेश जैन बॉबी, सुखदेव मेमोरिअल ट्रस्टचे संजीव थापर, डीलर असोसिएशनचे परमिंद्र सिंह बावजा, हिंदू-शिख मुस्लिम एकता संघटनेचे अरविंद राणा, बागवाली गली असोसिएशचे राजकुमार सिंगला, शिवरात्री महोत्सव कमिटीचे संजय गौतम,बार संघाटे अॅडव्होकेट राजेश महाजन अशा अनेकांना आपल्यावतीनं पाच – पाच लाख रुपये या बक्षीसाच्या रकमेत देण्याची घोषणा केलीय.
शिवसेना पंजाबचे अध्यक्ष संजीव घनौली आणि चेअरमन राजीव टंडन यांनी ही माहिती दिलीय. ‘शत्रूंचं मुंडकं छाटून भारतमातेच्या पायावर टाकणाऱ्या भारतपुत्राला ही बक्षिसाची रक्कम दिली जाईल’ अशी घोषणा त्यांनी केलीय. यावेळीच भारत आणि पाकिस्तानमधला व्यापार आणि व्यवहारांवर बंदी आणली जावी, अशीही त्यांनी मागणी केलीय.
First Published: Tuesday, January 15, 2013, 14:03