Last Updated: Saturday, September 22, 2012, 13:10
www.24taas.com, नवी दिल्लीदेशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कालच देशाला उद्देशून संदेश दिला. पैसे काही झाडाला लागत नाही. असे वक्तव्य केल्याने देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. त्याचे परिणाम आजही दिसून आले.
डिझेल आणि एलपीजी यांच्या किमती वाढवण्याबाबत केंद्र सरकार जरी पटण्यासारखी स्पष्टीकरण देत असले, तरी लोकांचा राग कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांसह अनेक मंत्र्यांना लोकांच्या विरोधाला बळी पडावे लागते आहे. शनिवारी खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही कडव्या विरोधाला सामोरे जावे लागले.
आज विज्ञानभवनात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने आपला शर्ट काढत पंतप्रधानांना विरोध केला. पंतप्रधान मनमोहनसिंग विज्ञान भवनात आर्थिक विकास या विषयावरील एका परिषदेत सहभागी होण्यास पोहोचले होते.
First Published: Saturday, September 22, 2012, 13:02