Last Updated: Saturday, September 8, 2012, 11:59
www.24taas.com, गोवा नुकत्याच झालेल्या पुणे बॉम्बस्फोट प्रकरणी गोव्यात एका संशयितला अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपीचं नाव अफजल खान असं असल्याचं समजतंय.
पुणे बॉम्बस्फोटांशी अफजलचा संबध असल्याचा संशय आहे. गोव्यातल्या वेर्णा पोलिसांनी अफजलला ताब्यात घेतल आहे. त्याच्याजवळ अनेक आक्षेपार्ह कागदपत्र आणि डेबिटकार्ड सापडलेत. दरम्यान, महाराष्ट्र एटीएसची टीमही गोव्यात दाखल झाली आहे. अफजलच्या चौकशीतून काही माहिती मिळतेय का? याचा तपास सुरु आहे. तपासकामात ‘एनआयए’ची मदत घेण्यात येणार असल्याचं गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलंय.
First Published: Saturday, September 8, 2012, 11:59