पुणे बॉम्बस्फोटातील आणखी एकाला अटक, Pune Bombblast : one arrest

पुणे बॉम्बस्फोटातील आणखी एकाला अटक

पुणे बॉम्बस्फोटातील आणखी एकाला अटक
www.24taas.com,नवी दिल्ली

पुणे स्फोटात सहभागी असल्याच्या संशयावरुन हैदराबादमधून इंडियन मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मकबूल असं या अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे. त्याचा पुणे स्फोटात सहभाग असल्याच्या संशयावरुन ही कारवाई करण्यात आलीय. पुणे बॉम्बस्फोटांप्रकरणी ही पाचवी अटक आहे.

यापूर्वी पुणे बॉम्बस्फोटप्रकरणी दिल्लीतून तिघांना अटक करण्यात आली. त्यानंतर जयपूरमधून त्यांच्या आणखी एका साथीदाराला अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी हैदराबादेतून आणखी एकाला अटक केलीये.

ऑगस्टमध्ये पुण्यात झालेल्या बॉम्बस्फोट करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं पुणे बॉम्बस्फोटातल्या तीन संशयित सय्यद फिरोज, इम्रान आणि असद यांना या आधीच अटक केली होती. पुणे साखळी बॉम्बस्फोटातील तीन संशयीत दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर वेगळीच माहिती पुढे आली आहे.

त्यांना पुण्यात नाही तर मुंबईत स्फोट घडवून आणायचे होते. मुंबईत बॉम्बस्फोट घडविण्याचा त्यांचा कट होता. मात्र, प्लॅन बदलून पुण्यात स्फोट घडविले गेलेत, अशी माहिती दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी दिली होती.

इंडियन मुजाहिद्दीनच्या संघटनेसाठी असद आणि इम्रान खान काम करीत होते. हे दोघे रुडकी शहरातून दिल्लीत आले होते. त्यांना पोलिसांनी अटक केली. असद हा नांदेडच्या दयानंद कॉलेजचा विद्यार्थी आहे. येरवडा जेलमध्ये सिद्दिकीच्या झालेल्या हत्येचा बदला घेण्यासाठी पुण्यात बॉम्बस्फोट घडविले असल्याची त्यांनी कबुली दिली आहे. शरद मोहोळ आणि भालेराव या गुंडांनी सिद्दिकीची केली होती हत्या.

First Published: Friday, October 26, 2012, 22:17


comments powered by Disqus