वडिलांना शिक्षा करा, त्यांनी केला माझ्यावर रेप, Punish my father, he raped me: a Haryana schoolgirl`

वडिलांना शिक्षा करा, त्यांनी केला माझ्यावर रेप

वडिलांना शिक्षा करा, त्यांनी केला माझ्यावर रेप

www.24taas.com, झी मीडिया, सोनपत

हरियाणाच्या शालेय विद्यार्थीनीवर दोन वेळा सामुहिक बलात्कार झाल्यानंतर तिच्या स्वतःच्या वडिलांनी तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

पोलिसांना दिलेल्या धक्कादायक माहितीत पीडित मुलीने सांगितले की, माझ्यावर सोनपत येथील गावातील मुलांनी दोन महिन्यात दोनवेळा सामुहिक बलात्कार केला. तसा माझ्यावर माझ्या घरातही बलात्कार झाला आहे.

या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या मुलांच्या टोळक्याला अटक करण्यात आले. पण त्यानंतर तिचे वडीलसुद्धा तिच्यावर बलात्कार करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

माझ्या वडिलांनी माझ्यावर सप्टेंबर महिन्यात बलात्कार केला. ही गोष्ट कोणाला सांगितल तर मी ठार करेल अशी धमकी त्यांनी मला दिली. मला शिक्षण करायचे होते, पण माझ्या वडिलांना मी वेश्या व्यवसाय करावा असे वाटते. मला वाचवा असे या मुलीने आपल्या जबाबात नोंदविले आहे.

स्थानिक स्वयंसेवी संस्था या मुलीला पोलिसांकडे घेऊ गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तीला पुन्हा घरी जाण्याची इच्छा नसल्याचे तिने पोलिसांनी सांगितले. या प्रकारानंतर पोलिसांनी वडिलांना अट केली असून बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

माझ्या वडिलांना माझ्यावर बलात्कार केला, मला त्यांच्यासोबत राहायचे नाही. त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. मला न्याय पाहिजे आहे. तीने या आशयाचे पत्रही लिहिले आहे. सध्या पीडित मुलगी स्वयंसेवी संस्थेकडे वास्तव्यास आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 20, 2014, 11:56


comments powered by Disqus