Last Updated: Wednesday, August 21, 2013, 15:37
www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली2 जी स्पेक्ट्र म घोटाळ्यासंबंधी सुप्रिम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत टाटा उद्योगसमूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा हे देखील उपस्थित होते. टाटा यांचं राडियाबरोबरील संभाषण फोडणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, यासाठी टाटा यांनी कोर्टात धाव घेतली आहे.
2 जी स्पेक्ट्र म घोटाळ्यासंबंधी कॉर्पोरेट लॉबिस्ट नीरा राडिया यांच्या वेगवेगळ्या उद्योगपती, पत्रकार, राजकारणी आणि इतरांबरोबरील दूरध्वनीवरील संभाषणासंदर्भात सुप्रिम कोर्टात सुनावणी आहे. राडिया यांच्या संभाषणाच्या टेप्स ‘सार्वजनिक` झाल्यासंदर्भातील माहिती गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात सरकारनं सुप्रिम कोर्टात सादर केली होती. या अहवालाची प्रत आपणांसही मिळावी, यासाठी टाटा यांनी कोर्टात अर्ज दाखल केला. त्याच संदर्भातली प्रकरणाची सुनावणी सुरु असताना टाटा यांनीही हजेरी लावल्याचं कळतंय.
2 जी स्पेक्र्स मसंदर्भात राडिया यांचं मोठमोठ्या व्यक्तींसोबतचं फोनवरील संभाषण प्रसिद्ध झालं होतं. त्यानंतर टाटा यांनी हा आपल्या खासगीपणावर घाला असल्याचा आरोप करत कोर्टात धाव घेतली होती.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, August 21, 2013, 15:37