रघुराम राजन आज स्वीकारणार पदभार! Raghuram Rajan will take over the governorship of The Reserve Bank Today

रघुराम राजन आज स्वीकारणार पदभार!

रघुराम राजन आज स्वीकारणार पदभार!
www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली

केंद्रीय अर्थमंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार रघुराम गोविंद राजन आज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा पदभार स्वीकारतील. विद्यमान गव्हर्नर डी. सुब्बाराव यांची जागा ते घेतील. ५० वर्षीय राजन हे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्त होणारे सर्वात कमी वयाचे अधिकारी आहेत.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ६ ऑगस्टला रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी तीन वर्षांसाठी रघुराम राजन यांच्या नियुक्तीला मंजूरी दिली. मागील वर्षी ऑगस्टमध्ये राजन अर्थमंत्रालयासोबत जोडले गेले. याआधी राजन यांनी बँक अधिकारी, शिक्षक आणि तंत्रज्ञान अधिकारी म्हणून काम केलंय. आंतरराष्ट्रीय मुद्रानिधीशीही संबंध आलेल्या राजन यांनी शिकागो विद्यापीठतही शिकवलंय.

राजन यांनी आयएमएफमध्येही सर्वात कमी वयाचे आर्थिक सल्लागार आणि अर्थतज्ज्ञ म्हणून ऑक्टोबर २००३ ते डिसेंबर २००६मध्ये कार्यभार सांभाळला. भारतीय अर्थव्यवस्थेची परिस्थिती बिकट असतांना रघुराम राजन आरबीआयचा पदभार स्वीकारत आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी राजन सरकार आणि आरबीआयमध्ये सामंजस्य निर्माण करतील, असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करतायेत.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, September 4, 2013, 11:34


comments powered by Disqus