Last Updated: Thursday, October 18, 2012, 19:49
www.24taas.com, मुंबई<>
काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांना गुरुवारी सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला. राहुल यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली बलात्काराची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली.
समाजवादी पक्षाचे माजी आमदार किशोर समरिते यांनी ही याचिका दाखल केली होती. खोटी याचिका दाखल केल्याने समरिते यांना लखनौ हायकोर्टाने तब्बल ५० लाखांचा दंड केला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने तो कमी करुन २० लाख रुपये केला आहे.
समरिते यांनी राहुल यांच्याविरोधात कुठलाही पुरावा नसताना याचिका दाखल केली होती. यामुळे राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबियांची प्रतिमा मलीन झाली आहे. असेही कोर्टाने म्हंटले आहे.
First Published: Thursday, October 18, 2012, 14:45