Last Updated: Saturday, February 8, 2014, 14:50
www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबादआरएसएस ही विषारी विचारधारा आहे... आणि या विचारधारेनंच गांधीजींची हत्या केली, असा घणाघाती आरोप राहुल गांधींनी केलाय. राहुल गांधींची आज मोदींच्या गुजरातमध्ये बारडोलीत सभा झाली. त्यात ते बोलत होते.
गुजरातमधल्या रॅलीत राहुल गांधींनी मोदींवरही टीका केलीय. मोदींना इतिहासाचं ज्ञान नाही, असं राहुल म्हणालेत. काँग्रेसनं आरटीआय आणलं पण मोदींनी गुजरातमध्ये लोकायुक्त मंजूर होऊ दिलं नाही, असं राहुल म्हणालेत.
चहावाल्यांचा आदर करा, सगळ्यांचाच आदर करा, पण जे लोकांना मूर्ख बनवतात, त्यांचा आदर करु नका, असं राहुल म्हणालेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, February 8, 2014, 14:50