राहुल गांधींची पंतप्रधान पद स्वीकारण्याची तयारी, Rahul Gandhi clears stand on PM role, says ready

राहुल गांधींची पंतप्रधान पद स्वीकारण्याची तयारी

राहुल गांधींची पंतप्रधान पद स्वीकारण्याची तयारी
www.24taas.com, झी मीडिया,नवी दिल्ली

काँग्रेचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान पद स्वीकारण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांनी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्याच्या हालचालींना आता जोर बळावला आहे. त्याआधी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी राहुल पंतप्रधान झालेले मला आवडेल असे सूचक वक्तव्य केले होते.

४३ वर्षीय राहुल गांधी यांनी एक मुलाखत दिली त्यावेळी आपण पंतप्रधान पद स्वीकारण्यास राजी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान पद स्वीकारणार असल्याचे म्हटले आहे. आपली लोकशाही प्रणाली आहे. या लोकशाहीवर आपला विश्वास आहे. जनतेने निवडलेले प्रतिनिधीच ठरवतील पंतप्रधान कोण असेल ते. मात्र, देशात काँग्रेसचे सरकार येणे म्हत्वाचे आहे. संघटनेने जी आपल्यावर जबाबदारी सोपवली आहे किंवा भविष्यात जी जबाबदारी सोपवली जाईल, ती मी पूर्ण निष्ठेने सांभाळण्याचा प्रयत्न करेन, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केलेय.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते की, मी पुन्हा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही. तसेच राहुल गांधी हे पंतप्रधान पद भूषविण्यास सक्षम आहेत. त्याआधी भाजपने पंतप्रधान पदाचा उमेदवार गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव पुढे केले आणि त्यांना अधिकृत मान्यता गोव्यातील अधिवेशनात दिली. त्यामुळे मोदींना टक्कर देण्यासाठी राहुल गांधी यांचे नाव जाहीर करावे, असा काँग्रेसमधील नेत्यांचा सूर होता. तर काहींचा विरोध होता. घाई करण्याचे कारण नाही. मात्र, आता राहुल गांधी यांनी पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे काँग्रेसचा पंतप्रधान पदाचा उमेदवार राहुल असलतील याचे संकेत मिळत आहेत.

आपल्या देशात सर्वाधिक तरुण आहेत. त्यांना रोजगारासह पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. देशाचा विकासदर वाढला पाहिजे. प्रत्येकाला घर असावे, पोटभर अन्न मिळावे, त्यांच्यात सुरक्षिततेची भावना असली पाहिजे. समाजात एकोपा असायला हवा. हेच स्वप्न घेऊन मी राजकारणात उतरलो. याचसाठी पक्षात एक व्यवस्था निर्माण करणे हे माझे स्वप्न आहे. यानुसार प्रत्येक व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार संधी मिळायला हव्यात. त्याला जबाबदारीची जाणीव व्हावी.

देशासाठी एक दीर्घकालीन ‘व्हिजन’ असावे यावर माझे लक्ष केंद्रित आहे, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
यावेळी राहुल यांनी ज्येष्ठ खासदारांना कानपिचक्याही दिल्या आहेत. पंतप्रधानपदासाठी काँग्रेसमध्ये अनेक पात्र व्यक्ती आहेत. जनाधार असलेले लोक आहेत. खासदार, आमदार थेट जनतेत जात नाहीत, याच्याशीही मी सहमत नाही. पक्षासोबत युवकांना जोडण्याची गरज आहे. आम्ही गेल्या काही वर्षांत त्या दिशेने काम केले आहे आणि यापुढेही करत राहू.

आम्ही काही आखलेल्या गोष्टींची अंमलबाजवानी दिल्लीतील आम आदमीचे सरकार करीत आहे. परंतु मी त्यांच्या पद्धतीशी सहमत नाही. आमचे निर्णय लोकांच्या हिताचे आणि अल्पावधीतच फायद्याऐवजी सुरक्षित भविष्याच्या दृष्टिकोनातून घेतल गेले पाहिजे. तसेच प्रियंका वढेरा या काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्ता आहेच. या नात्याने त्या मला आणि पक्षाला मजबूत करण्यासाठी मदत करत आहे. याव्यतिरिक्त त्यांची निवडणुकीत आणखी वेगळी कुठली भूमिका असेल, असे मला वाटत नाही.

भाजपवर टीका
भाजपला व्यक्तिकेंद्रित सत्ता हवी आहे. हे देशहिताचे नाही. सत्ता कुण्या एका व्यक्तीच्या विचाराने अथवा त्याच्या पद्धतीने चालवली जाऊ नये. सर्वांना सोबत घेऊन चालल्यानेच देशातील १२० कोटी लोकांचे भवितव्य अधिक उज्ज्वल घडवता येऊ शकेल. या देशाच्या डीएनएमध्ये काँग्रेस आहे. भाजप काँग्रेसमुक्तीचा नारा देत असला तरी आमचा पक्ष जनतेची देशाशी बांधिलकी जपणारा पक्ष आहे, याची त्यांना कल्पना नाही, असे राहुल म्हणालेत.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 14, 2014, 10:28


comments powered by Disqus