राहुल गांधींचा किस घेणाऱ्या महिलेला दिले पेटवून , Rahul Gandhi Kiss: Woman burned by husband

राहुल गांधींचा 'किस' घेणाऱ्या महिलेला दिले पेटवून

राहुल गांधींचा 'किस' घेणाऱ्या महिलेला दिले पेटवून
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आसामच्या जोरहाटमध्ये एका कार्यक्रमात महिलांनी गराडा घालत `किस` केला होता. चुंबन घेणाऱ्या महिलेच्या पतीने तिलाच पेटवून दिले आणि स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आसाममध्ये घडली.

जोरहाटमध्ये राहुल गांधी आले असता ते सभा मंडपात खुर्चीत बसले होते. यावेळी त्यांना पाहायला महिलांनी गर्दी गेली. राहुल गांधींना पाहण्यासाठी महिलांनी गर्दी झाली. त्यांनतर त्यांनी राहुल गांधी यांना प्रेमाने, कौतुकाने गोंजारायला सुरुवात केली. तर अन्य काही महिलांनी राहुल गांधी यांचा चक्क किस घेतला. या स्थितीत राहुल फारच अस्वस्थ झाले. या अजब परिस्थितीमुळे त्यांनी कसंतरी स्वत:ला सावरल.

राहुल गांधी दोन दिवसांच्या आसामच्या दौऱ्यावर होते. आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी गुवाहाटीमधील नीलांचल पर्वतामधील प्रसिद्ध शक्तीपीठ कामाख्या देवी मंदिरात पूजाही केली. त्यानंतर राहुल यांनी शहरातील अजारातील डॉन बास्को विद्यापीठामध्ये विद्यार्थींची भेटही घेतली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, March 1, 2014, 11:57


comments powered by Disqus