Last Updated: Wednesday, January 23, 2013, 15:59
www.24taas.com, सुरतसुरत शहरात जर एका कोपऱ्यावर तुम्हाला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी चिकन लेग पीस विकताना दिसले, तर हैराण होऊ नका. सुरतमध्ये राहाणारा २४ वर्षीय प्रशांत सेठी हा राहुल गांधींचा डुप्लिकेट म्हणून प्रसिद्ध आहे. राहुल गांधी ज्यादिवशी काँग्रेसचे उपध्यक्ष झाले, त्यादिवशी प्रशांतच्या स्टॉलवर चाहत्यांची गर्दी उसळली. प्रशांतनेही आनंदाने आपल्या मित्रांना पार्टी दिली होती.
प्रशांतचा मित्र परिवार त्याला राहुल म्हणूनच हाक मारतो. त्याची पत्नी गुंजनदेखील त्याला राहुलच म्हणते. जेव्हा प्रशांत हसतो, तेव्हा त्याच्या उजव्या गालावरही राहुल गांधींसारखीच खळी पडते. दोन वर्षांपूर्वी युवा काँग्रेसच्या निवडणुकीदरम्यान बऱ्याच ठिकाणी त्याला आमंत्रित केलं गेलं होतं. तो युवा काँग्रेसचा सदस्यही बनला होता. मात्र, काही काळाने पुन्हा तो आपल्या चिकन पीस बनवण्याच्या कामाला लागला.
मात्र, हा राहुल गांधींचा गुजराती डुप्लिकेट स्वतः मात्र गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचा फॅन आहे. प्रशांत म्हणतो, “मोदी हे राहुल गांधीपेक्षा महान नेते आहेत, असं मला वाटतं. मोदी एक आदर्श नेते असल्याचं त्यांनी गुजरातमध्ये दाखवून दिलं आहे.”
First Published: Wednesday, January 23, 2013, 15:59