Last Updated: Thursday, October 25, 2012, 16:42
www.24taas.com,नवी दिल्ली काँग्रेस महासचिव राहुल गांधी यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात लवकरच समावेश होण्याची शक्यता आहे. येत्या रविवारी मंत्रीमंडळ विस्तार आणि फेरबदल होण्याची शक्यता आहे.यावेळी राहुल यांचे मंत्रीपद निश्चीत होण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला गांधी यांचा मंत्रीमंडळ समावेश होईल, असं बोललं जातंय. त्यांच्याकडे ग्रामविकास किंवा मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा कारभार दिला जाऊ शकतो.
मंत्रीमंडळ विस्ताराच्यावेळी राहुलच्या गळ्यात माळ पडण्याची शक्यता आहे. कारण पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गांधी यांना अनेकदा मंत्रीमंडळात येण्याचं जाहीर आवाहन केलंय. कदाचित येत्या रविवारी राहुल प्रत्यक्ष सरकारमध्ये सामील होऊ शकतात.
First Published: Thursday, October 25, 2012, 15:50