बिहारीचं आहे ठाकरे, युतीच्या पुस्तकात उल्लेख, Raj Thackeray belongs to Bihar, shows book

बिहारीच आहे ठाकरे, युतीच्या पुस्तकात उल्लेख

बिहारीच आहे ठाकरे, युतीच्या पुस्तकात उल्लेख
www.24taas.com, नवी दिल्ली

ठाकरे कुटुंबीय हे बिहारचे असल्याचे वक्तव्य केल्यानंतर राजकारण ढवळून टाकणाऱ्या काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी यासंदर्भातील पुरावाच सादर केला आहे. दिग्विजय सिंह यांनी शिवसेना-भाजपच्या सरकारच्या काळात प्रसिद्ध झालेल्या एका पुस्तकातील उल्लेखच दाखवत पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

युतीच्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र सरकारने प्रबोधनकार ठाकरे यांचे समग्र चरित्र प्रसिद्ध केले होते. प्रबोधनकार हे राज ठाकरे यांचे आजोबा आहे. या पुस्तकात ठाकरे कुटुंबियाच्या इतिहासावर काही विस्तारीत स्वरूपात माहिती आहे. या पुस्तकातील ४५ क्रमांक पानावरील उल्लेखानुसार ठाकरे परिवार मगध म्हणजे बिहारहून भोपाळला गेले होते. त्या ठिकाणाहून ते चित्तौडगड आणि नंतर पुण्याजवळ वास्तव्यास आल्याचे सांगण्यात आले आहे.

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह म्हणाले, हे पुस्तक माझ्याकडे पहिल्यापासून होते. या पुस्तकाचा आधार घेऊन मी ठाकरे परिवार बिहारमधून आल्याचे सांगितले होते. राज ठाकरे यांनी स्वतः बिहारचे असल्याचा गर्व केला पाहिजे आणि बिहारी लोकांबद्दल तिरस्कार दूर ठेवून प्रेमाने वागले पाहिजे, असा सल्लाही दिग्विजय सिंह यांनी दिला आहे.

First Published: Wednesday, September 5, 2012, 22:16


comments powered by Disqus