Last Updated: Saturday, September 1, 2012, 18:37
www.24taas.com, नवी दिल्लीराज ठाकरे यांच्या बिहारींबाबतच्या वक्तव्यावर उत्तर भारतीय नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय जनता दलचे नेते रामकृपाल यादव यांनी राज ठाकरेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी म्हटले आहे की, राज ठाकरे यांनी आशा भोसले यांची माफी मागितली पाहिजे. राज यांचे मानसिंक संतूलन ढासळले असून वाटेल ते बोलत सुटले आहेत.
मुंबई शहर बाहेरुन आलेल्या लोकांनी मोठे केले आहे. ठाकरे कुटुंबिय हे मूळचे बिहारचे आहे. त्यामुळे राज यांनी कोणाला उपदेशाचे डोस पाजू नये.
First Published: Saturday, September 1, 2012, 14:05