Last Updated: Tuesday, September 4, 2012, 19:05
www.24taas.com, नवी दिल्लीअमर जवान स्मारकाची तोडफोड करणा-या अब्दूल कादीरवर कारवाई व्हायलाच हवी. यात महाराष्ट्र आणि बिहार असा मुद्दा येतोच कुठे ? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. तसंच बिहारच्या मुख्य सचिवांनी पाठवलेल्या पत्राच्या मुद्यावर संसदेत चर्चा करण्याऐवजी महाराष्ट्रातले खासदार पळून जात होते.
महाराष्ट्रातल्या खासदारांनी या विषयावर भूमिकाही मांडली नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केलीय. तसंच हिंदी न्यूज चॅनेल्स टीआरपीसाठी एखादा विषय नीट समजावून सांगत नाहीत. त्यामुळे देशातलं वातावरण गढूळ झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला. बिहारी नेत्यांविरोधात ठाकरे एकवटले आहेत.
सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून बाळासाहेब ठाकरेंनी बिहारी नेत्यांवर जहरी टीका केलीय. शिवसेनेनंही मनसेच्या सूरात सूर मिसळलाय...मात्र राज यांच्या मीडियाबाबतचं वक्तव्य चुकीचं असल्याची टीकाही शिवसेनेनं केलीय.
First Published: Tuesday, September 4, 2012, 18:56