आसाराम बापूंचा जेलमध्येच मुक्काम! Rajasthan HC defers Asaram’s bail plea to Oct 01

आसाराम बापूंचा जेलमध्येच मुक्काम!

आसाराम बापूंचा जेलमध्येच मुक्काम!
www.24taas.com , झी मीडिया, जोधपूर

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारा प्रकरणी राजस्थान पोलिसांच्या अटकेत असलेले आसाराम बापू यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढं ढकलण्यात आलीये. आता १ ऑक्टोबरपर्यंत बापूंचा मुक्काम जेलमध्ये असणार आहे.

सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आसाराम बापूंनी १३ सप्टेंबर रोजी जोधपूर खंडपीठात जामीनासाठी अर्ज केला होता. ज्येष्ठ नामांकीत वकील राम जेठमलानी यांनी बुधवारी हायकोर्टात आसाराम बापूंची बाजू मांडली.

आसाराम बापूंना इंदूरच्या आश्रमामधून २ सप्टेंबर रोजी अटक झाल्यापासून जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, September 19, 2013, 08:30


comments powered by Disqus