Last Updated: Wednesday, February 5, 2014, 17:27
www.24taas.com, वृत्तसंस्था, राजस्थान एका आयएएस अधिकाऱ्यानं तरुणीचं लैंगिक शोषण केल्याची घटना राजस्थानात घडलीय. ही घटना उघडकीस आल्यानंतर राजस्थान सरकारने या आयएएस अधिकाऱ्याला निलंबीत केलंय.
बी बी मोहंती असं या आयएएस अधिकाऱ्याचं नाव आहे. `एमबीए`चं शिक्षण घेत असणाऱ्या एका तरुणीनं मोहंती यांच्याव लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी संबंधीत तरुणीनं महेशनगर पोलीस ठाण्यात २५ जानेवारी रोजी तक्रार दाखल केली होती. बुधवारी, चौकशीसाठी मोहंतीना पोलीस आयुक्तांसमोर हजर रहायाचं होतं, मात्र त्यावेळी मोहंती उपस्थित नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. मात्र, मोहंती त्यांच्या निवासस्थानी सापडले नाहीत. त्यानंतर २५ जानेवारीला त्यांना पोलिसांनी बेपत्ता घोषित केलंय.
दरम्यान, मोहंतीना राजस्थानातील नागरी सेवा लवादाच्या अध्यक्षपदावरून निलंबित करण्यात आलंय. त्यासाठी पोलिसांकडून मिळालेल्या अहवालावरून बी. बी मोहंती यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. मोहंती हे अतिरिक्त मुख्य सचिव अधिकारी या पदावर कार्यरत होते.
कारवाईसाठी राजस्थान पोलीसांकडून विलंब होत असल्याचा आरोप पीडित तरुणीनं केलाय. तसंच या प्रकरणाची सीबीआय तपासणी व्हावी, अशीदेखील तिनं मागणी केलीय.
First Published: Wednesday, February 5, 2014, 17:27