Last Updated: Thursday, February 27, 2014, 13:19
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीमाजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या चार मारेकऱ्यांच्या सुटकेला आज सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती दिली. या स्थगितीमुळे जयललिता सरकारला मोठी चपराक बसली आहे.
तमिळनाडूतील जयललिता सरकारने याआधी तीन मारेकऱ्यांना सोडआले होते. त्यानंतर इतर चार मारेकऱ्यांचा सुटकेचा सरकारने निर्णय घेतला होता. तमिळनाडू सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. मारेकऱ्यांच्या सुटकेला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली होती.
केंद्राच्या या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने चार मारेकऱ्यांच्या सुटकेवर सहा मार्चपर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी असलेल्या संथन, मुरुगन आणि पेरारीवलन यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला होता. या निर्णयानंतर तमिळनाडू सरकारने या तीनही आरोपींसह अन्य चार आरोपींच्या सुटकेचा निर्णय घेतला होता.
सर्वोच्च न्यायालयाने संथन, मुरुगन आणि पेरारीवलन यांच्या सुटकेला स्थगिती दिली आणि नलिनी, रॉबर्ट पिओस, जयकुमार आणि रवीचंद्रन या अन्य चार आरोपींबाबत केंद्राला याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, February 27, 2014, 11:55