प्रचंड गदारोळात तेलंगणा विधेयकावर मोहोर, Rajya Sabha passes Telangana Bill

प्रचंड गदारोळात तेलंगणा विधेयकावर मोहोर

प्रचंड गदारोळात तेलंगणा विधेयकावर मोहोर
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

लोकसभेत मंजूर झालेले तेलंगणा विधेयक राज्यसभेतही प्रचंड गदारोळानंतर मंजूर झाले. त्यामुळे स्वतंत्र तेलंगणा राज्य निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता देशात २९ राज्ये होणार आहेत.

तेलगू देसम आणि तृणमूल काँग्रेस यांच्या सदस्यांनी प्रचंड गोंधळ घातला. आज गुरुवारी आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयक २०१४ राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. लोकसभेत दोन दिवसांपूर्वीच हे विधेयक मंजूर झाले असल्याने आता वेगळ्या तेलंगणा राज्यनिर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. सीमांध्रला पाच वर्षे विशेष राज्याचा दर्जा देण्याची घोषणा पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केली.

तेलंगणा विधेयक राज्यसभेत चर्चेला आले त्यावेळी पंतप्रधानांच्या भाषणावेळी सीमांध्रभागातील खासदारांची `फाड दो फेक दो` अशी जोरदार घोषणाबाजी करीत प्रचंड गोंधळ घातला. यावेळी पंतप्रधानांनी आपल्या भाषणात बोलताना सीमांध्रला विशेष दर्जा दिला. तसेच सीमांध्रभागाच्या विकासासाठी खास पॅकेज दिले. तसेच पंतप्रधानांनकडून सहाकलमी विकास योजना देण्यात येईल असे सांगण्यात आले.

तेलंगणा विधेयकावर राज्यसभेत मतदान झाले. काही मुद्यांवर चर्चा झाली. शिवसेना, तृणमूल, सीपीआयने या विधेयकाला विरोध केला. भाजप, बसप यांनी पाठिंबा दिला होता. यावेळी भाजपच्या नायडूंनी यामध्ये काही सुचविलेल्या शिफारसी सुचविल्या. हे विधेयक घटनाबह्य असल्याचे फलक विरोधकांकडून दाखविण्यात आले. तेलंगणाची निर्मिती ही घटनाबह्य असल्याचे विरोधकांकडून सांगण्यात आले.

हे विधेयक मंजूर झाल्याचे वृत्त पसरताच हैदराबाद, तेलंगणामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 20, 2014, 20:42


comments powered by Disqus