पंतप्रधान निवासस्थानाबाहेर भाजपची निदर्शनं Rally outside PM`s house

पंतप्रधान निवासस्थानाबाहेर भाजपची निदर्शनं

पंतप्रधान निवासस्थानाबाहेर भाजपची निदर्शनं
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राजीनाम्यासाठी भाजपच्या युवा मोर्चाने पंतप्रधान निवासस्थानाबाहेर निदर्शन केलं. निदर्शन करणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी अखेर पोलिसांना पाण्याचा वापर केला.

पवन बन्सल, अश्वनीकुमार यांच्यापाठोपाठ अनेक घोटाळे बाहेर येऊ लागले असताना आता जनतेचा केंद्र सरकारवर विश्वास राहिला नसून पंतप्रधानांनीही आता राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली. निदर्शक पंतप्रधान यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचू नयेत यासाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. अनेक कार्यकर्त्यांना बसमध्येच डांबून ठेवण्यात आलं होतं.

दर दिवशी काँग्रेसच्या मंत्र्यांकडून होत असणारे भ्रष्टाचार बाहेर येत असताना पंतप्रधानांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, May 12, 2013, 23:39


comments powered by Disqus