बस दरीत कोसळली; 17 जण ठार, Ramban bus accident : Injured admitted to a hospital in Jammu

बस दरीत कोसळली; 17 जण ठार

बस दरीत कोसळली; 17 जण ठार
www.24taas.com, झी मीडिया, जम्मू

जम्मू आणि काश्मीरच्या जम्मू भागात मंगळवारी सकाळी एक प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळून भीषण अपघात झालाय. या भीषण दूर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला तर 27 जण जखमी अवस्थेत आहेत.

अपघातग्रस्त बस जम्मूहून काश्मीर खोऱ्याकडे जात होती. बसमध्ये प्रवास करणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी होती. काश्मीरमध्ये सुरु असलेल्या भर्ती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ते जात होते.

एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात जम्मूपासून 170 किलोमीटर दूर रामबन जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर हायवेवर डिगडोलमध्ये झालाय. घाटाच्या रस्त्यांवरून जात असताना बस चालकाचा वाहनावरचा ताबा सुटला आणि बस दरीत कोसळली.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालाय तर 27 जण जखमी आहेत. जखमींना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी हॅलिकॉफ्टरमधून जम्मूला आणलं गेलंय. इथं हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बसमध्ये प्रवासकरणारे प्रवाशांमध्ये काही प्रवासी गुजरातमधूनही आले होते.

या भागात तैनात सेनेचे जवान बचाव कार्यात प्रशासनाची मदत करत आहेत, असंही अधिकाऱ्यांनी म्हटलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 20, 2014, 11:13


comments powered by Disqus