रमजान मुबारक हो : आजपासून पवित्र रमजान सुरु!, ramdan starts from today

रमजान मुबारक हो : आजपासून पवित्र रमजान सुरु!

रमजान मुबारक हो : आजपासून पवित्र रमजान सुरु!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

आजपासून मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमझानला सुरूवात होतेय. आजपासून मुस्लिम बांधव ‘रोजे’ म्हणजे रमझानचे उपवास पाळतील.

आजपासून पुढचा महिनाभर मुस्लिम बांधव रमझानचा पवित्र नमाज आणि उपवास सुरू करतील. त्यामुळे पुढचा एक महिना भक्तीमय वातावरणात पार पडणार आहे. पहाटेच्या वेळेस लवकर रमझानची विशेष प्रार्थना करण्यात येते तिला ‘ताहाजूद’ असं म्हणतात. त्यानंतर ‘सेहरी’ म्हणजेच अल्पोपहार करण्यात येतो. त्यानंतर ‘तारावीह’ ही विशेष प्रार्थना केली जाते. विशेष म्हणजे ‘तारावीह’ प्रार्थना ही रमझानची विशेषता आहे.

इस्लामी दिनदर्शिकेतील रमझान हा नववा महिना… या पवित्र महिन्याची समाप्ती ‘इद-उल-फित्र’ ने होते. उपवास पहाटेपासून सुरू होतो आणि सूर्यास्त होताच तो संपतो. संपूर्ण दिवसभर मुस्लिम बांधव या महिन्यात अन्न-पाणी घेत नाहीत किंवा धूम्रपान तसेच शारीरिक संबंधही ठेवत नाहीत. सूर्योदयापूर्वी जेवण सुहूर आणि सुर्यास्तानंतर इफ्तार जेवण घेतले जाते.

या काळात सत्कर्म करावं, दानधर्म करावं आणि सदाचरण करून भक्तीमार्गाचा आनंद घ्यावा, हीच इस्लामची शिकवण आहे. त्याचबरोबर विशेष म्हणजे रमझानचे खास खाद्यपदार्थ हेही एक आकर्षण आहे.
‘झी २४ तास’कडून सर्वांनाच रमझानच्या हार्दिक शुभेच्छा...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, July 11, 2013, 11:09


comments powered by Disqus