`बारबालांपेक्षा अभिनेत्रींचे चाळे अश्लील`, ramgopal yadav on heroine

`बारबालांपेक्षा अभिनेत्रींचे चाळे अश्लील`

`बारबालांपेक्षा अभिनेत्रींचे चाळे अश्लील`
www.24taas.com, झी मीडिया, इटावा

वादग्रस्त वक्तव्य आणि राजकारण यांचं नातं काही संपता संपत नाही. आता या वादग्रस्त वक्तव्यं करणाऱ्यांमध्ये आणखी एका महाशयांचं नाव जोडलं गेलंय. या महाशयांना अभिनेत्री आणि बारबाला यांच्यात काहीच फरक दिसत नाहीए किंबहूना बारबाला या अभिनेत्रींपेक्षा बऱ्या असंच ते म्हणतायत.

हे महाशय म्हणजे समाजवादी पक्षाचे सरचिटणीस रामगोपाल यादव. उत्तर प्रदेशातील इटावा येथे कुरेशी समाजातर्फे एक विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत रामगोपाल यादव यांनी भाषणाला सुरुवात केली. टाळ्यांचा असा काही सोस जडला की त्यांनी मग आपल्या प्रत्येक वाक्यावर टाळ्या मिळवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र सरकारनं घातलेल्या डान्सबार बंदीवर त्यांनी कडाडून टीका केली.

‘काँग्रेसनं महाराष्ट्रात डान्सबारवर बंदी आणली पण सिनेमांचं काय... सिनेमातून दिसणाऱ्या अभिनेत्री तर बारगर्ल्सपेक्षा अश्लील चाळे करतात. त्यांचे कपडे पाहिले तर पाहणाऱ्यालाच लाज वाटते. बारगर्ल्स या अभिनेत्रींपेक्षा अधिक चांगल्या वाटतात. बारबाला आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी नाचतात पण या नट्या फक्त मजा घेण्यासाठी सिनेमांतून कसेही अश्लील चाळे करण्यासाठी तयार होतात’ असं रामगोपाल यादव यांनी म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 22, 2013, 08:45


comments powered by Disqus