आठवीच्या मुलीला सामूहिक बलात्कार करून जिवंत जाळले, rape case in Uttarpradesh

आठवीच्या मुलीला सामूहिक बलात्कार करून जिवंत जाळले

आठवीच्या मुलीला सामूहिक बलात्कार करून जिवंत जाळले
www.24taas.com, वृत्तसंस्था, लखनऊ

दिल्लीनंतर मुंबईत सामूहिक बलात्कारानंतर हैदराबादमध्येही अशी घटना घडली. आता अशीच एक घटना उत्तर प्रदेशात उजेडात आली आहे. आठवीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

देशात स्त्रियांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढतच आहेत. उत्तर प्रदेशात आठविच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात आले. यात या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

उत्तर प्रदेशातील दक्षिणेकडील एका गावात राहणारी ही मुलगी आठव्या इयत्तेत शिकत होती. मंगळवारी रात्री ती मुलगी आपल्या बहिणीसह शेतात गेली असता तीन जणांनी तिच्यावर हल्ला चढवला. त्यानंतर सामूहिक अत्याचार केला. या प्रकाराची आपण पोलिसांकडे तक्रार करू अशी धमकी त्या मुलीने आरोपींना दिली असता त्यांनी तिला जिवंत जाळले.

आपल्या बहिणीला वाचविण्यासाठी पिडीत मुलीच्या बहिणीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. तिला तात्काळ रुग्णालयातही दाखल केले. मात्र तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, October 23, 2013, 16:20


comments powered by Disqus