Last Updated: Thursday, January 10, 2013, 14:23
www.24taas.com, नवी दिल्ली मध्यप्रदेशचे भाजप खासदार रमेश बैस यांना मोठ्या मुलींवर किंवा स्त्रियांवर झालेले बलात्कार समजू शकतात पण, लहान बालिकांवर बलात्कार करणाऱ्यांना मात्र फाशीची सजा व्हायला हवी, असं वाटतंय. मात्र, असं विधान करून ते चांगलेच अडचणीत आलेत.
गेल्या काही दिवसांपासून बलात्कारांच्या संख्येत झालेली वाढ वेगवेगळ्या माध्यमातून प्रकर्षानं समोर येतोय. या विषयावर वादग्रस्त विधानं करणं हे तर आता प्रसिद्धी मिळवणं खूपच सोपं झालंय. आता बीजेपीचे खासदार रमेस बैस यांनीही असंच एक वादग्रस्त विधान केलंय. ‘महिलाओं और लड़कियों के साथ बलात्कार की बात समझ में आती है लेकिन नाबालिग के साथ रेप करने वालों को फांसी की सजा मिलनी चाहिए’ असं विधान बैस यांनी केलंय. अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणं हे त्यांना घृणास्पद कृत्य वाटतंय. अशा व्यक्तींना फासावरच चढवलं पाहिजे, असा आग्रहदेखील त्यांनी केलाय. छत्तीसगडच्या कांकेरमधील एका हॉस्टेलमधील अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेसंबंधी ते बोलत होते.
पण, आपल्या या वादग्रस्त वक्तव्यावरून बैस चांगलेच अडचणीत आलेत. त्यांच्या या विधानावर काँग्रेसनं चांगलाच समाचार घेतलाय. ‘बलात्कार... मग, तो कुणावरही असो... ते एक घृणास्पद कृत्यंच आहे. रमेश बैस यांच्या या विधानाची आम्ही निंदा करत आहोत’ असं काँग्रेसचे प्रवक्ते शैलेश नितीन त्रिवेदी यांनी म्हटलंय.
First Published: Thursday, January 10, 2013, 14:20