चालत्या ट्रेनमध्ये चिमुरडीवर बलात्कार!, rape on 7 year old in chattisgarh

चालत्या ट्रेनमध्ये चिमुरडीवर बलात्कार!

चालत्या ट्रेनमध्ये चिमुरडीवर बलात्कार!
www.24taas.com, झी मीडिया, छत्तीसगड

छत्तीसगडमध्ये अवघ्या सात वर्षांच्या चिमुरडीवर चालत्या ट्रेनमध्ये बलात्कार केला गेलाय. बलात्कारानंतर या चिमुरडीला बिलासपूर रेल्वे स्टेशनच्या जवळच ट्रेनमधून खाली फेकून देण्यात आलं.

पीडित अल्पवयीन मुलगी कोतवाली भागात गंभीर अवस्थेत आढळली त्यानंतर या घटनेचा खुलासा झाला.

बिलासपूरच्या पोलीस अधीक्षक रतनालाल डांगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पीडित अल्पवयीन मुलगी कोतवाली पोलीस स्टेशनजवळ भक्त कांवरराम मार्केटजवळ गंभीर अवस्थेत आढळली. त्यानंतर तिला छत्तीसगड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हॉस्पीटलमध्ये रविवारी सकाळी दाखल करण्यात आलं’. तिच्यावर बलात्कार झाल्याचं मेडिकल अहवालात स्पष्ट झालंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, August 12, 2013, 15:16


comments powered by Disqus