७० वर्षीय महिला, बलात्कार, वासनांध तरूणाचे दुष्कृत्य, rape on 70 year old women

७० वर्षीय महिलेवर बलात्कार, वासनांध तरूणाचे दुष्कृत्य

७० वर्षीय महिलेवर बलात्कार, वासनांध तरूणाचे दुष्कृत्य
www.24taas.com, हरियाणा

महिलांवरील अत्याचारा दिवसेंदिवस वाढच होत आहे. त्यामुळे कायदा अस्तिवात आहे की नाही, असा प्रश्न आज विचारला जातोय. हरियाणामध्ये तर सर्वाधिक महिलांवर अत्याचार होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

हरियाणात आता पुन्हा असाच प्रकार घडला आहे. त्यामुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला आहे की नाही? हाच प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. हरियाणाता माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट घडली आहे. एका वासनांध तरुणाने चक्‍क एका ७० वर्षीय महिलेवर बलात्‍कार केल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे.

हरियाणातील बुधखेडा गावात ही घटना घडली आहे. राजबीर असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा बलात्कार झालेल्या महिलेचा नातेवाईक आहे. महिलेच्‍या पतीने त्‍याच्‍याविरोधात तक्रार दाखल केली. महिलेची वैद्यकीय तपासणीही केली असून याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आले आहे.

First Published: Thursday, December 6, 2012, 11:46


comments powered by Disqus