मुलीचा सख्ख्या भावावर बलात्काराचा आरोप! Rape on a girl from her sibling

मुलीचा सख्ख्या भावावर बलात्काराचा आरोप!

मुलीचा सख्ख्या भावावर बलात्काराचा आरोप!
www.24taas.com, पतौडी

१२ वीची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थिनीने आपल्याच सख्ख्या भावावर बलात्काराचा आरोप केला आहे. पतौडीच्या पोलीस स्टेशनमध्ये तिने आपल्या भावावविरोधात तक्रार दाखल केली आहे. या शिवाय आपल्या मुख्याध्यापकांवरही लैंगिक शोषणाचा आरोप तिने केला आहे.

मुलीने केलेलल्या तक्रारीप्रमाणे ती चौथीत असल्य़ापासून तिचा सख्खा भाऊ तिच्यावर वारंवार बलात्कार करत आहे. बलात्कारासोबतच भाऊ तिला गप्प राहाण्याविषयी धमकी देई. घरी कुणाला सांगितलं, तर तुला घरात राहू देणार नाही, अशी धमकी तो देई. आता तो इंडियन नेव्हीमध्ये काम करतो. पण अजूनही मुलीच्या मनात त्याच्याविषयी भीती आहे.


याशिवाय तिच्या कॉलेज तिने आपल्या कॉलेजच्या मुख्याध्यापकांवरही लैंगिक शोषणाचा आरोप केला. मात्र यामागे तिचं कारस्थान असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुख्याध्यापकांनी तिला कॉलेजमध्ये एका मुलासोबत अश्लील चाळे करताना पकडलं होतं. तसंच, तिचं प्रेममत्रही त्यांच्या हाती लागलं होतं. त्यामुले तिला कॉलेजमधून हाकलून तिला फक्त परीक्षेपुरताच कॉलेजमध्ये येण्याची परवानगी दिली. या गोष्टीचा राग मनात ठेवून तिने परीक्षेनंतर त्यांच्यावर आरोप केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

First Published: Wednesday, March 27, 2013, 16:07


comments powered by Disqus