अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार, Rape on immature girl at her home

अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार

अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार
www.24taas.com, हिस्सार

महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. त्यात अल्पवयीन मुलीही बळी पडत आहेत. डाया गावातील अल्पवयीन विद्यार्थीनीवर गावातीलच चार युवकांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय घरी नसल्याचा डाव साधत त्या नराधमांनी तिच्यावर जबरदस्ती केली. ही घटना ३ नोव्हेंबर रोजी घडल्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार देऊन सुद्धा पोलिसांनी पाच दिवस काहीही कारवाई केली नाही.

शुक्रवारी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलिस अधिक्षकांकडे न्यायाची मागणी केली, तेव्हा पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. रात्री उशिरा तिची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. ९ वीची विद्यार्थीनी असलेल्या त्या मुलीने पोलिसांना सांगितले की, ३ नोव्हेंबर रोजी सकाळी साधाराण ११ वाजता तशाळेतून घरी आली. त्यावेळी तिच्या घरातील सगळे शेतात गेले होते. तिला घरात एकटे पाहून चार युवक घरात घुसले.

त्यांनी तिने आरडाओरड करु नये यासाठी तिचे तोंड बांधले. तिच्या डोळ्यावरही पट्टी बांधली. त्यानंतर त्या नराधमांनी तिच्याशी जबरदस्ती केली. तिने या घटनेची वाच्यता केली तर, तिला जीवानिशी मारण्याची धमकी दिली होती. मात्र, तिने हिम्मत दाखवत आजोबाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली.

First Published: Saturday, November 10, 2012, 18:39


comments powered by Disqus