सायकलस्वार परदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार, rape on swiss woman in mp

सायकलस्वार परदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार

सायकलस्वार परदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार
www.24taas.com, दातिया, मध्यप्रदेश

मध्यप्रदेशातल्या दातियामध्ये स्वित्झर्लंडच्या महिलेवर शुक्रवारी रात्री सात जणांनी रात्री सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलीय.

स्वित्झर्लंडची रहिवाशी असलेली ही महिला आपल्या पतीसोबत ताजमहाल पाहण्यासाठी आली होती. त्यापूर्वी त्यांनी शुक्रवारी रात्री बतीयामध्ये मुक्काम केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही विदेशी महिला आणि तिचा पती सायकल घेऊन आग्र्याच्या दिशेने जात असताना त्यांनी मझिआ या गावात मुक्काम केला. टेन्ट लावून राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. इथेच रात्री सुमारे नऊच्या सुमारास या सात नराधमांनी हे संतापजनक कृत्य केलंय. या नराधमांनी या स्वीस जोडप्याला मारहाणही केलीय.

स्वीस महिलेला ग्वाहलेरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिची अवस्था नाजूक असल्याची माहिती हॉस्पिटलच्या सूत्रांनी दिलीय. या जोडप्याजवळ असलेला लॅपटॉप, १० हजार रुपये आणि इतर सामानही जवळ आहे. आरोपींचा तपास पोलीस करत आहेत.

First Published: Saturday, March 16, 2013, 14:25


comments powered by Disqus