विधवा महिलेवर बलात्कार, पुरूष सहकाऱ्याला नग्न करून मारहाण, Rape on Widow woman at Gujrat

विधवा महिलेवर रेप, सहपुरूषाला नग्न करून मारहाण

विधवा महिलेवर रेप, सहपुरूषाला नग्न करून मारहाण
www.24taas.com, उंझा

गुजरातच्या उंझा जिल्ह्यातील एका ३७ वर्षीय विधवा महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे, तर त्या महिलेसोबत असणाऱ्या पुरूष सहकाऱ्याला नग्न करून अतिशय निर्दयीपणे मारहाण करण्यात आली आहे. उंझा पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित महिला आणि पुरूष एका गाडीत बसून काही चर्चा करीत होते. तेव्हा तेथे दोन अज्ञात व्यक्ती आले आणि त्यांनी चाकूचा धाक दाखवून पुरूष सहकाऱ्याला धमकी दिली.

पोलिसांच्या मते, यानंतर आरोपींनी पुरूष सहकाऱ्याला नग्न करून निर्दयीपणे मारहाण केली, एकाने महिलेचे हात आणि पाय तिच्याच साडीने बांधले आणि त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. ही घटना काल रात्री ९ ते ११ च्या दरम्यान घडली.

पोलिसांनी सांगितले की, सकाळी काही लोकांनी महिलेच्या विव्हळण्याचा आवाज ऐकला. त्यानंतर पोलिसांना बोलविण्यात आलं. पीडित महिलेच्या मते, दोन्ही आरोपी हे २५-२० च्या वयोगटातील होते. तर पुरूष सहकाऱ्याला बेशुद्ध अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. त्यानंतर मेहसाणाच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

First Published: Thursday, December 27, 2012, 11:51


comments powered by Disqus