Last Updated: Wednesday, May 15, 2013, 14:40
www.24taas.com, झी मीडिया, चंदीगड महिलांवर होणाऱ्या अत्याचारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता तर महिला जेलमध्येही सुरक्षिक नसल्याचे समोर आलं आहे. हरियाणामधील बल्लभगडच्या नीमका तुरुंगातील दोन महिला कैद्यावर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तुरुंग अधीक्षक आणि उप-अधीक्षकांवर बलात्काराचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे.
दोन्ही अधिकारी दारूच्या नशेत महिला कैद्यांना मारहाण करतात. तसेच त्यांचे लैंगिक शोषणही केले जाते, असे पीडित महिला कैद्याच्या नातेवाईकाने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पीडि़त महिला कैद्यांचे जबाब मंगळवारी कोर्टात नोंदवण्यात आले.
कोर्टाने संबंधित तुंरुग अधिकार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांनी मंगळवारी रात्री उशीरा दोन्ही अधिकार्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 15, 2013, 14:37