बलात्कार : भाऊ-बहीण, वडील-मुलगी नात्याला काळीमा , Raped by father and brothers, two arrested in Uttar Pradesh

बलात्कार : भाऊ-बहीण, वडील-मुलगी नात्याला काळीमा

बलात्कार : भाऊ-बहीण, वडील-मुलगी नात्याला काळीमा
www.24taas.com , झी मीडिया, लखनऊ

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ मध्ये हैराण करणारी घृणास्पद घटना समोर आली आहे. भाऊ-बहिण आणि वडील-मुलगी नात्याला काळीमा फासणारा प्रकार उजेडात आलाय. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

रेल्वे लोको फॅक्टरीमध्ये काम करणारा ५२ वर्षीय बाप आपल्या ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करत आला. त्यानंतर मोठ्या भावाची ती शिकार झाली. मात्र, मुलीने याबाबत आपल्या आईला सांगितले. मात्र, आपली बदनामी होईल या भीतीने तिची आईही गप्प राहिली. शिवाय तिलाही गप्प राहण्यास सांगितले.

लखनऊमध्ये एका मोहल्ल्यात लोको फॅक्टरीत काम करणारा पिडितिचे पिता आपल्या दोन मुलांसह मुलीबरोबर राहत होता. २००४मध्ये त्यांने मुलीसोबत झोपू लागला. याबाबत मुलीने आईकडे तक्रार केली. मात्र, आईने बदनामीच्या भीतीपोटी गप्प राहिली. त्यानंतर दोन भाऊ आणि तिची आई हा प्रकार सहन करीत होती. त्यानंतर मोठ्या भावानेही तिच्यावर बलात्कार केला.

याबाबत लहान भावाने विरोध केला. त्याला या दोघा बाप-लेकांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. लहान भावाचे काहीही त्यांच्यापुढे चालले नाही. हा प्रकार गेली नऊ वर्षे सुरूच होता. तोपर्यंत या पिडित मुलीला घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला होता. या पिडितेला ब्युटीशियनचे प्रशिक्षण घेण्याची संमती देण्यात आली. ती पहिल्यांदा घराच्या बाहेर पडली ती थेट मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या जनता दरबारात.

यादव यांच्या जनता दरबारात आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढाच वाचला. त्यानंर पोलिसांना यादव यांनी आदेश दिलेत. आदेशानंतर पोलिसांनी तीन जणांना अटक केली. दरम्यान, पोलिसी हिसका दाखविताच वडील आणि भावाने बलात्काराचा गुन्हा कबूल केला आहे. तिच्या आईची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, September 5, 2013, 11:51


comments powered by Disqus