बलात्कार करणाऱ्याला पीडितेनंच जिवंत जाळलं!, Rapist burnt alive by victim in Bihar

बलात्कार करणाऱ्याला पीडितेनंच जिवंत जाळलं!

बलात्कार करणाऱ्याला पीडितेनंच जिवंत जाळलं!
www.24taas.com, पाटणा
सरकार देशातील महिलांना सुरक्षित वातावरण तयार करण्याचा प्रयत्नात असताना बिहारमधील एका महिलेने रणरागिणी होत आपल्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमाला धडा शिकवला आहे. या महिलेने नराधमाला जीवंत जाळण्याचा प्रकार घडला आहे.

बिहारमधील परसा बाजार पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सोइयन गावात हा प्रकार घडला. ४५ वर्षीय विधवा सोमवारी रात्री आपल्या घरी झोपली असताना गावातील गुंड भोला ठाकूरने तिच्या घरात जबरदस्ती प्रवेश केला. त्याने या महिलेवर जबरदस्ती करून बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने लावला.

यावेळी गुंड बोला ठाकूर याने खूप दारू प्यायल्याने तो बेशुद्ध पडला आणि त्या घरातच कोसळला. पीडित महिलेने यावेळी संतापाच्या भरात आपल्या कपड्यावर रॉकेट टाकले आणि भोला ठाकूरसह घराला आग लावली. त्यानंतर ती बाहेर पळाली आणि घराला कुलूप लावले आणि गावकऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला.

त्यानंतर गावकऱ्यांना घराचा दरवाजा तोडला यावेळी ठाकूर गंभीररित्या जळाला होता. त्यानंतर पाटणा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. परंतु तेथे तो मरण पावला.

First Published: Wednesday, April 3, 2013, 21:08


comments powered by Disqus