आंदोलनाने दिलं `ती`ला बळ, पंजाबमधला बलात्कारी गजाआड Rapist in Punjab arrested

आंदोलनाने दिलं `ती`ला बळ, पंजाबमधला बलात्कारी गजाआड

आंदोलनाने दिलं `ती`ला बळ, पंजाबमधला बलात्कारी गजाआड
www.24taas.com, संगरूर

दिल्लीतील पीडित मुलीने जागृकतेची मशाल संपूर्ण देशात पेटवली त्याचे परिणाम देशभरात जाणवू लागले आहेत. दोन महिन्यांपूर्वी एका विद्यार्थीनीवर बलात्कार करून आरोपी मोकाट होता. विद्यार्थीनीने दिल्लीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना अल्टिमेटम दिल्यानंतर आखेर आरोपीला पोलिसांनी गजाआड केलंय.

‘ती’ आपल्याला सोडून गेली...मात्र `ती`ने जी हिम्मत आणि ताकदीची मशाल पेटवली त्याचा प्रकाश देशातील काना कोप-यात पोहचला आणि एक बलात्कारातील आरोपी गजाआड झालाय. पंजाब राज्यातल्या संगरूरमध्ये राहणाऱ्या विद्यार्थीनिसोबत दोन महिन्यापूर्वी बलात्कार झाला होता. बलात्कार झालेल्या या पीडित तरूणीने पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरोधात फिर्याद दिली. मात्र तरीही आरोपी मोकाट फिरत होता. दिल्लीतील प्रकरणानंतर पीडित मुलीला आशेचा किरण दिसला. आरोपीला दोन दिवसात गजाआड केलं नाही तर आंदोलन करण्याचा इशारा तिने पोलिसांना दिला.

पीड़ित मुलीच्या अल्टिमेटमनंतर दोन महिन्यांपासून मोकाट फिरणारा आरोपी आखेर गजाआड झाला. पीडित मुलीने दोन महिन्यापूर्वी तक्रार देऊनही बलात्कारातील आरोपीला पोलिसांनी मोकाट का सोडलं हाच खरा प्रश्न आहे. एकूनच दिल्लीतल्या प्रकरणाने देशभरातील महिना आन्याय आत्याचाराविरोधात लढण्याचं बळ दिलंय एवढ मात्र नक्की

First Published: Sunday, December 30, 2012, 16:44


comments powered by Disqus