रतन टाटांची सूत्रं सायरस मिस्त्रींकडे, Ratan Tata to retire tomorrow, Cyrus Mistry to succeed him

रतन टाटांची सूत्रं सायरस मिस्त्रींकडे

रतन टाटांची सूत्रं सायरस मिस्त्रींकडे
www.24taas.com, मुंबई

उद्योगपती रतन टाटा यांनी निवृत्ती घेतली. त्यामुळे आदी जाहीर केल्याप्रमाणे त्यांचा पदभार रतन टाटांच्या विश्वासातील सायरस पी. मिस्त्री यांच्याकडे सोपविण्यात आलाय.

टाटा समूहातील कंपन्यांची मूळ कंपनी ‘टाटा सन्स’नं सायरस मिस्त्री यांच्याकडे अध्यक्षपद सोपवले आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात रतन टाटा यांचा दबदबा राहिला आहे. त्यांनी अथक परिश्रमातून आपला टाटासमूह उभा केला. आज मार्केटमध्ये टाटासमूहाचे नाव आदराने घेतले जाते. टाटा समूहाने जगात आपला ठसा उमटविला आहे. एका टाटा हाऊसला १०० अब्ज डॉलरमध्ये आणलं. हा डोलारा आता सायरन मिस्त्रि यांना पाहावा लागणार आहे.

‘टाटा सन्स’चे अध्यक्ष रतन टाटा निवृत्त झाल्याने सायरस मिस्त्री हे पदभार स्वाकारत आहेत. मिस्त्री २००६ पासून टाटा सन्सच्या डायरेक्टरपदी कार्यरत आहेत. नोव्हेंर २०११ मध्ये त्यांची नियुक्ती उपाध्यक्ष (डेप्युटी चेअरमन) म्हणून करण्यात आली होती.

First Published: Thursday, December 27, 2012, 15:05


comments powered by Disqus