Last Updated: Wednesday, May 22, 2013, 13:09
www.24taas.com, झी मीडिया मुंबईसोन्यांच्या दरामध्ये आज मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. काल सोन्याचे दर घसरले होते. २६,०००च्या खाली सोन्याचे दर गेले होते. सोन्याच्या भावात वाढ झाल्याने खरेदीत घट होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दरात वाढ ही चांगलीच झाली आहे. गेले काही दिवस ह्यात थोडीफार घट होत होती. मात्र आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात बऱ्यापैकी वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने व्यापाऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे.
काही दिवस सोन्याच्या दरात घट होत होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. पहा काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या. सोन्याच्या दरात मागील काही दिवसात होत असणारी घट यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ दिसून येत होती. आज वाढ झाल्याने ग्राहक कसा प्रतिसाद देतात हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आज सोन्याच्या दरात वाढ झाली. त्याचप्रमाणे चांदीच्याही दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीच्या खरेदीत घट होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दरात वाढ त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही वाढ झाल्याने ग्राहक सोने-चांदी खरेदीसाठी कसा प्रतिसाद देतायेत याकडेच व्यापाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.. पहा वेगवेगळ्या शहरात काय भाव आहेत सोन्याचे...
एक नजर टाकुयात.. आज काय आहे विविध राज्यातील शहरांमध्ये सोन्याचा भाव : सोनं ( प्रति १० किग्रॅ)
मुंबई
सोनं : २६,५०५ रूपये (+४५५) (२४ कॅरेट) – २४,३९३ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४४,११५ (+११४५)
चेन्नई
सोनं : २६,५८० रूपये (२४ कॅरेट) (+४१५) – २४,६५० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४३,५९५ (+१९८०)
दिल्ली
सोनं : २७,०५० रूपये (२४ कॅरेट) (+६८०) - २४,६६८ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४४,२०० (+२०३०)
कोलकाता
सोनं : २६,४५५ रूपये (२४ कॅरेट) – २४,६५० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४२,६००
बंगळुरू
सोनं : २६,८५१ रूपये (२४ कॅरेट)
चांदी : ४४,१००
हैदराबाद
सोनं : २७,००० रूपये (२४ कॅरेट) - २५,८९८ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,०००इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 22, 2013, 12:44