रिझर्व्ह बँकेची रेपोदरात वाढ, गृहकर्ज महाग, RBI hikes interest rates again by 0.25%, EMIs to go up further

रिझर्व्ह बँकेची रेपोदरात ०.२५ टक्के वाढ, गृहकर्ज महागणार

रिझर्व्ह बँकेची रेपोदरात ०.२५ टक्के वाढ, गृहकर्ज महागणार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

रिझर्व्ह बॅंकेचे आज पतधोरण जाहीर करण्यात आले. यावेळी रेपोदरात ०.२५ टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याचे माहिती बॅंकेचे गव्हर्नर गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिली. रेपोदरात झालेल्या दरवाढीमुळे गृहकर्ज वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेपोदरात ०.२५ टक्के वाढ करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, बँकेने सीआरआर (कॅश रिझर्व्ह रेशो) दरात कोणताही बदल न करता तो चार टक्के कायम ठेवण्यात आला आहे.

राजन यांनी त्यांच्या कारकिर्दीतला दुसरा आढावा सादर केला होता. केवळ आर्थिक धोरण अर्थव्यवस्थेला पुन्हा विकासाकडे नेऊ शकत नाही, असेही या आढाव्यात म्हटले होते. सध्याच्या आर्थिक वर्षात एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ४.८ टक्के राहील, असे अनुमान आहे.

रिझर्व्ह बॅंकेने उचललेल्या काही ठोस पावलांमुळे रुपयाचा परकी चलन विनियम दर हळूहळू बदलेल, अशी आशा राजन यांनी व्यक्त केली होती. याआधीच्या आढाव्यात हेच अनुमान ५.७ टक्के इतके होते. घाऊक आणि किरकोळ महागाई दर सध्याच्याच पातळीवर राहील, अशी शक्यता असल्याचे ते म्हणालेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, October 29, 2013, 13:56


comments powered by Disqus