`कॅग` रिपोर्टची घेतली रिझर्व्ह बँकेने दखल RBI on CAG report

`कॅग` रिपोर्टची घेतली रिझर्व्ह बँकेने दखल

`कॅग` रिपोर्टची घेतली रिझर्व्ह बँकेने दखल
www.24taas.com, नवी दिल्ली

कर्जमाफी प्रकरणी कॅगचा रिपोर्ट संसदेत सादर झाल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं याची गंभीर दखल घेतली आहे. कर्जमाफी प्रकरणी आरबीआयनं देशातील बँकांच्या अध्यक्षांना एक पत्र पाठवलं आहे. कर्जमाफीचा फायदा मिळालेल्या शेतक-यांची यादीच आरबीआयनं बँकांकडून मागवली आहे.

या कर्जमाफीचा गैरफायदा घेणा-यांकडून पुन्हा पैसे वसूल करण्याचे आदेशही आरबीआयनं बँकांना दिले आहेत. तसचं योग्य शेतक-यांना कर्जवाटप झाले असल्यास त्यांना सर्टिफिकेट देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसंच कर्जमाफीचे खरे हक्कदार असणा-यांची यादी तयार करण्याचे आदेशही आरबीआयनं या पत्रात दिले आहेत. शेतक-यांकडून वसुलीसाठी बँकांच्या प्रमुखांना जबाबदार धरण्यात येणार आहे. तसंच या घोटाळ्यासाठी जबाबदार असणा-या बँक कर्मचारी आणि ऑडिटर्सवर कडक कारवाई करण्याचे आदेशही आरबीआयनं दिले आहेत.


कर्जमाफीच्या कागदपत्रांत फेरफार करणा-यांवरही कठोर कारवाईची मागणी या पत्रात करण्यात आलीय. कागदपत्रातील फेरफारीसाठी बँकेच्या मुख्य दक्षता अधिका-याला जबाबदार धरण्यात येणार आहे.

First Published: Thursday, March 7, 2013, 20:04


comments powered by Disqus