Last Updated: Monday, April 28, 2014, 08:10
www.24taas.com, झी मीडिया, गुरगावगुरगाव इथं एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. इथल्या एका २७ वर्षीय युवतीनं आपल्या सख्ख्या भावावर बलात्काराचा आरोप केला आहे. तिचा सख्खा भाऊ मागच्या अनेक वर्षांपासून तिच्यासोबत हे दुष्कर्म करीत असल्याचा तिचा आरोप आहे.
या प्रकरणी पीडित तरुणीनं दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये तिनं आरोप केला आहे की, तिचा भाऊ २००५मध्ये ती बारावीत होती तेव्हापासून तिच्यावर बलात्कार करीत आहे. तिच्या लग्नानंतरही नराधम भाऊ तिच्यावर असं नीच कृत्य करीत राहिला आणि त्यांच्या आईलाही याबद्दलची कल्पना होती, असं पीडित तरुणीनं म्हटलंय.
संबंधित पीडित तरुणी भारत सरकारच्या एका मंत्रालयात नोकरीला आहे, तर आरोपी भाऊ एका मोठ्या रुग्णालयात कनिष्ठ डॉक्टर म्हणून काम करतो.
मानेसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्या भावाला अटक केली. त्याच्यावर बलात्कार, छेडछाड आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, April 28, 2014, 08:10