Last Updated: Wednesday, December 26, 2012, 17:17
www.24taas.com, तिरुअनंतपुरमकेरळमध्ये शाही परिवाराचे तब्बल ३०० कोटी रुपयांचे हिरे लुटले गेल्याची घटना घडली आहे. यावेळी हरिहर शर्मा या हिरे व्यापाऱ्यांची हत्याही झाली. शाही परिवारातीलच एक असणारे हरिहर शर्मा हिऱ्यांचा सौदा करत असताना ही घटना घडली.
मवेलिक्करा या शाही कुटुंबाचे ३०० कोटी रुपयांचे हिरे हरिहर शर्मा सौद्यासाठी घेऊन तिरुअनंतपुरममध्ये आले होते. आपले वकील मित्र हरिदास यांच्या घरी हा सौदा चालू असताना अचानक एका गँगने घरात घुसून हल्ला केला आणि ३०० कोटींचे हिरे लुटले.
अचानक घरात घुसलेल्या गँगने हरिदास यांना क्लॉरोफॉर्मचा गुगारा देऊन बेशुद्ध केलं, तर हरिहर यांची हत्या केली. ही हत्या कुणी केली याबद्दल अजूनही संभ्रम असला तरी तेथील पुराव्यांवरून योगेश आणि प्रेमराज अशी या हल्लेखोरांची नावं असल्याचं समोर आलं आहे.
First Published: Wednesday, December 26, 2012, 17:17