Last Updated: Friday, December 14, 2012, 13:45
www.24taas.com, नवी दिल्लीराजधानी दिल्ली शुक्रवारी पहाटे झालेल्या कारवाईत एका हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट उद्धवस्त झाले आहे. दिल्लीतील रोहिणीच्या सेक्टर क्रमांक १८मध्ये गेल्या काही दिवसांपासून ट्रान्सपोर्ट ऑफिसच्या नावावर सेक्स रॅकेट चालविण्यात येत होते.
या संदर्भात अनेक दिवसांपासून तक्रार दाखल केल्यानंतरही पोलिसांकडून काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना संतापून या घराचे कुलूप तोडले आणि घरात घुसले. यावेळी नागरिकांना दोन मुलींसह दोन ग्राहकांना रंगेहाथ पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. अटक करण्यात आलेल्या मुलींमध्ये एक मुलगी परदेशी असल्याचेही उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी केस दाखल केली असून तपास सुरू आहे.
या घराला पाहून असे वाटत नव्हते की, एखाद्या ट्रॅव्हल कंपनीचे ऑफिस आहे. ठिकठिकाणी दारूच्या बाटल्या, पलंग आणि अस्ताव्यस्त पडलेले कपडे अशी अवस्था या ठिकाणी होती. रंगेहाथ पकडल्यानंतर मुली आणि ग्राहक घाबरून गेले होते. घटनेवरून लक्षात येत होते की, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालते.
First Published: Friday, December 14, 2012, 13:45