Last Updated: Friday, November 2, 2012, 22:47
www.24taas.com, नवी दिल्ली भारतीय वंशाची ब्रिटिश मॉडेल आणि अभिनेत्री सोफिया हयात हिने टीम इंडियाचा क्रिकेटर रोहित शर्माबरोबरचे आपले संबंध तोडून टाकले आहेत. सोफियाने याबाबतची घोषणा करताना म्हटले आहे की, मी रोहित शर्माशी डेट करणे बंद केले असून, मी एका जेटंलमॅनच्या शोधात आहे.
याआधी बातम्या आल्या होत्या की, सोफिया रोहितबरोबर डेट करीत आहे. मात्र सोफियाने आता नुकतेच टि्वीट करुन रोहितबरोबरचे आपले संबंध संपुष्टात आल्याचे म्हटले आहे. सोफियाने ट्विटर वर लिहले आहे की, `ओके, अफवांना आता मी पूर्णविराम देत आहे.
होय, मी रोहित शर्माबरोबर डेट करीत होते. मात्र आता आमच्यातील सर्व काही संपले आहे. मी त्याच्याशी आता कधीही डेट करणार नाही. मी आता एका सज्जन माणसाच्या शोधात आहे.
First Published: Friday, November 2, 2012, 22:29